मोदींपासून ते शिंदेपर्यंत उद्धव ठाकरेंनी सर्वांना धू धू धुतलं

मोदींपासून ते शिंदेपर्यंत उद्धव ठाकरेंनी सर्वांना धू धू धुतलं

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची हिंगोलीच्या रामलीला मैदानावर जाहीर सभा पार पडत आहे.
Published by :
shweta walge

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची हिंगोलीच्या रामलीला मैदानावर जाहीर सभा पार पडली विशेष म्हणजे शिंदे गटाचे नेते संतोष बांगर यांच्या जिल्ह्यात ही सभा होत आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटावर नाव न घेता हल्लाबोल केला आहे. तसच अनेक मुद्यावर देखिल त्यांनी भाष्य केलं आहे.

एकनाथ शिंदे गटावर हल्लाबोल

मी गद्दारावर वेळ घालनार नाही. मी तुमच्याशी बोलायला आलो आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदेवर टीका केली आहे.

संतोष बांगर यांचा समाचार

“ज्या गद्दाराला आपण नाक समजून पूजा केली, उलट तोच आपल्यालाच डसायला लागला. तुला पुंगी वाजवली तुला दूध पाजलं. मटक्याचे अड्डे चालवणाऱ्या हिंदुत्ववादी मानायचे का, उद्धटपणा येथे चालणार नाही”, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी बांगर यांचा समाचार घेला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका

एनडीएचा अमिबा झालाय, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीवरुन केलेल्या टीकेला टीकेने उत्तर दिलं आहे. आम्ही इंडिया तुम्ही घमेंडिया झाला आहात, तसेच इंडिया म्हणून आम्ही एकत्र आल्यानंतर पंतप्रधान घसरले”, असंही ठाकरे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर निशाणा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. 'शासन आपल्या दारी, थापा मारतो लय भारी' अशा खोचक शब्दात उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीकास्त्र सोडले. सरकार आपल्या दारी म्हणत असून, योजना फक्त कागदावर असल्याच ते म्हणाले आहेत.

मोदींपासून ते शिंदेपर्यंत उद्धव ठाकरेंनी सर्वांना धू धू धुतलं
'मी घाबरवत नाही, पण परिस्थिती गंभीर' असं का म्हणाले अजित पवार?

भाजपवर हल्लाबोल

डबल इंजिन सरकारला आता अजितदादांचा तिसरा डबा लागला आहे. अजून किती डबे लागणार आहेत. काय हो तुमच्या पक्षात काय कर्तृत्व नाही का?. चांगले नेते तयार करण्याचे कर्तृत्व नाही. नेते बाहरेचे लागतात. वडील माझे लागतात. पक्ष फोडला; पण वडील माझे वापरायचे. दिल्लीतील तुमच्या वडिलांमध्ये मते मागायची हिम्मत राहिलेली नाही का?

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com