Pravin Darekar Latest News
Pravin Darekar On Uddhav ThackerayGoogle

Pravin Darekar: प्रवीण दरेकरांनी उद्धव ठाकरेंचा घेतला समाचार; म्हणाले, "नडलो तर नडलो, पण स्वतः मात्र..."

समोरचा शत्रू कितीही मोठा असला तरी हर हर महादेव म्हणत तुटून पडायचं. इथे प्रचाराला याच, उरली सुरलेली गुरमी उतरवतो, असं थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना दिलं होतं. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
Published by :
Naresh Shende
Published on

Pravin Darekar On Uddhav Thackeray : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी राहील. सर्व सहन करून मी जिद्दीने उभा राहिलोय. समोरचा शत्रू कितीही मोठा असला तरी हर हर महादेव म्हणत तुटून पडायचं. इथे प्रचाराला याच, उरली सुरलेली गुरमी उतरवतो, असं थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना दिलं होतं. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना व्यक्तिगत धमकी दिली आहे. भाजप धमक्यांना भीक घालत नाही. बाळासाहेबांचा वारसा सोडल्याचं यातून स्पष्ट झालं आहे. नडलो तर नडलो, पण स्वतः मात्र बेक्कार पडलो, अशी ठाकरेंची स्थिती आहे, असं म्हणत दरेकरांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

प्रवीण दरेकर काय म्हणाले?

उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना व्यक्तिगत धमकी दिली आहे. भाजप धमक्यांना भीक घालत नाही. बाळासाहेबांचा वारसा सोडल्याचं यातून स्पष्ट झालं आहे. हे महाराष्ट्राच्या परंपरेला न शोभणारे वक्तव्य आहे. जनतेचं लक्ष विचलीत करण्यासाठी त्यांनी हे विधान केलं आहे. फडणवीस सर्वात लोकप्रिय नेते हे वारंवार सिद्ध झालंय. ठाकरेंनी सर्व परंपरा गुंडाळून नाक्यावर आणि बांधावर बोलावं, तशाचप्रकारे हमरीतुमरीचं हे विधान आहे.

नडलो तर नडलो, पण स्वतः मात्र बेक्कार पडलो, अशी ठाकरेंची स्थिती आहे. पूर्वी किती खासदार होते आणि आता किती आहेत, हे पाहावं. मोदी कामातून जनतेला जिंकत आहेत. लोक विरोधकांना विधानसभेत उत्तर देतील. ज्या झाडाला फळ येतात, त्यालाच लोक दगड मारतात, राज्यातील वांझोट्याना कुणी दगड मारत नाही. वैफल्यातून ही भाषा केली जात आहे. फडणवीसांना जितके दगड माराल, तेवढी त्यांना सहानुभूती मिळेल. हात उखडून फेकायची भाषा ते करत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com