Uddhav Thackeray Press Conference
Uddhav Thackeray Press Conference

"मोदी पराभवाच्या भीतीमुळं निवडणूक आयोगाचा वापर घरगड्यासारखा करतात"; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

"मोदी पराभवाच्या भीतीमुळं निवडणूक आयोगाचा वापर घरगड्यासारखा करतात. पक्षपातीपणा करत आहेत. मत नोंदवण्यासाठी दिरंगाई केली जात आहे"
Published by :

Uddhav Thackeray On PM Narendra Modi : महाराष्ट्रातला मतदानाचा शेवटचा टप्पा एक-दीड तासात थांबेल. मतदारांमध्ये खूप उत्साह आहे. मतदान करा, असं निवडणूक आयोगाकडून प्रत्येकाला मेसेजद्वारे सांगण्यात येत आहे. त्याप्रमाणे मतदार उतरलेले दिसत आहेत. लोकांची खूप गर्दी दिसतेय. पण निवडणूक आयोग पक्षपातीपणा करतोय. मतदान केंद्रात बसलेल्या निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींकडून खूप दिरंगाई केली जात आहे. तीन-चारवेळा नावं तपासली जात आहेत. ज्येष्ठ मतदारांना खूप त्रास झाला आहे. कोणत्याही प्रकारची सोय ठेवली नव्हती. पिण्याचं पाणीही नव्हतं. तरीदेखील मतदार रांगा लावून उभे आहेत. मोदी पराभवाच्या भीतीमुळं निवडणूक आयोगाचा वापर घरगड्यासारखा करतात. पक्षपातीपणा करत आहेत. मत नोंदवण्यासाठी दिरंगाई केली जात आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह निवडणूक आयोगावर टीका केली.

पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, नागरिकांनी मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहता कामा नये, असं मी त्यांना आवाहन करतोय. तुम्ही मतदान केंद्रात जाऊन उभे राहा आणि पहाटे पाच जरी वाजले, तरी निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींना सोडू नका. तुमच्या मतदानाचा हक्क बजावल्याशिवाय बाहेर पडू नका. ज्या केंद्रांमध्ये मतदान प्रकियेत उशीर केला जात आहे, त्यांची नोंद तातडीनं शिवसेना शाखेत करा. निवडणूक प्रतिनिधींची नावे विचारा, जेणेकरून न्यायालयात दाद मागता येईल. मला त्यांची नावं मिळाली तर मी पत्रकार परिषद घेऊन त्यांची नावं जाहीर करेन.

मोदींच्या विरोधातील मतदान कमी करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. ज्या भागात आम्हाला मतदान अधिक होत आहे, तिथे अशाप्रकारच्या तक्रारी येत आहेत. मतदान केंद्रात असणाऱ्या निवडणूक प्रतिनिधींची नावे विचारा, कारण तो आपला अधिकार आहे. ते ज्याप्रकारे तुमचं ओळखपत्र विचारतात, तसच तुम्हीही निवडणूत अधिकाऱ्यांचे ओळखपत्र तपासून घ्या. मोदी सरकार पराभवाच्या भीतीनं पछाडलेले लोक आहेत. मतदानासाठी जो विलंब लावला जात आहे, ते माफ केलं जाऊ शकत नाही. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून घाणेरडा खेळ खेळला जात आहे. निवडणूक आयोग भाजपची चाकरी करतोय, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com