Uddhav Thackeray: ठाकरे गट - समाजवादीसह युती! गंभीर आरोप करत  ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

Uddhav Thackeray: ठाकरे गट - समाजवादीसह युती! गंभीर आरोप करत ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

उद्धवसेना बळकट करण्यासाठी त्यांनी समाजवादी विचारांच्या पक्षांसोबत युती केली आहे.
Published by :
shweta walge
Published on

डावे-कम्युनिस्ट, समाजवादी आणि काँग्रेस, राष्ट्रवादीला कडाडून विरोध करत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाची उभारणी केली. २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी काँग्रेस, राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. आता उद्धवसेना बळकट करण्यासाठी आज (15 ऑक्टोबर) शिवसेना ठाकरे गट आणि समाजवादी पक्षाची संयुक्त बैठक रोजी पार पडली. यावेळी त्यांना महात्मा फुले यांची पगडी घालण्यात आली. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, 'महात्मा फुलेंची पगडी घालण्यासाठी तितकं मोठं डोकं लागतं, मी तितका मोठा नाही. त्यामुळे मी त्यांना म्हटलं की, ती माझ्या हातात द्या. मी मुख्यमंत्री असताना लाडका होतो पण आता कोणीही मला लाडके माजी मुख्यमंत्री असं म्हणत नाही, अशी मिश्किल टीप्पणी देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.'

मी आहे समाजवादी पक्षासोबत यामध्ये तुमच्या पोटात दुखण्याचा कारण काय. या पक्षामध्ये मुस्लिम देखील आहेत. पण ते देशावर प्रेम करणारे आहेत.' 'तुम्ही गुजरातमध्ये पाकिस्तानी संघावर फुलांचा वर्षाव करु शकता मग आम्ही समाजवादी पक्षासोबत आलो तर अडचण काय?' असा सवाल उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला.

मागे एका व्यक्तीने ज्या बोटाने भाजपला मत दिलं तेच बोट त्याने कापलं. कारण त्याचा भ्रमनिरास झाला. मी कोणच्या हातात माझ्या देशाचं भविष्य दिलं. त्यामुळे हा त्याचाच नाही तर संपूर्ण देशाचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे लोकांनी ठरवलं तर आपल्याला हा देश नक्की सुधारता येईल, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 'त्यामुळे तुम्ही जर तेव्हा आणि आजही शिवसेनेसोबत उभे राहिला असता तर आज महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद केवढी झाली असती', असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com