Uddhav Thackeray : महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचे स्वबळाचे संकेत; म्हणाले...
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त काल मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यातून बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेसाठी स्वबळाचे संकेत दिलेत.
उद्धव ठाकरे म्हणाले की, काही काळामध्ये महापालिका निवडणुका येणार आहेत. मी सगळ्यांशी बोलतो आहे. सगळ्यांचे मत आहे की एकटे लढा. ताकद आहे? अमित शाहांना जागा दाखवणार आहात? ठिक आहे. अजून निवडणूक जाहीर झालेली नाही. पण मला तुमची जिद्द बघू द्या, तुमची तयारी बघू द्या.
ज्या भ्रमात आपण राहिलो. त्या भ्रमातून पहिलं बाहेर या. ज्या क्षणी माझी खात्री पटेल आपली तयारी झाली. मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही.
यासोबतत ते पुढे म्हणाले की, जर तुम्ही सगळे शपथ घेऊन सांगत असाल तर जेव्हा वेळ येईल तेव्हा मी एकटा लढण्याचा निर्णय नक्की घेतल्याशिवाय राहणार नाही. असे उद्धव ठाकरे म्हणाले.