उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद; कोणत्या मुद्द्यांवर बोलणार याकडे लक्ष
उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद आहे. आज उद्धव ठाकरे नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर बोलणार याकडे लक्ष लागले आहे. आज दुपारी 12.30 वाजता मातोश्री येथे पत्रकार परिषद होणार आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि आपणही राजीनामा देऊ आणि वरळी येथे आपल्या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीला उभे राहून दाखवावे असे आव्हान आदित्य ठाकरे यांच्याकडून देण्यात आले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून थेट आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघ असलेल्या वरळीमध्ये मुख्यमंत्र्यांचा कोळी बांधवांकडून सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.यावर देखिल उद्धव ठाकरे भाष्य करण्याची शक्यता आहे.
मातोश्री या निवासस्थानी दुपारी साडेबारा वाजता ते पत्रकार परिषद घेतील. आज होणाऱ्या पत्रकार परिषदेत नेमके उद्धव ठाकरे कोणत्या मुद्द्यात हात घालणार याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.