मुंबईत भर पावसात शिवसेना भवनासमोर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन
बदलापूरमधील एका शाळेमध्ये दोन शाळकरी मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र मविआच्या बंदला मुंबई हायकोर्टाकडून मज्जाव केला. बंद मागे घेतल्यानंतर महाविकास आघाडीकडून राज्यभर मूक आंदोलन करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर मुंबईत भर पावसात ठाकरे गटाचं शिवसेना भवनासमोर निषेध आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे सहभागी झाले आहेत. बदलापूर प्रकरणाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे. उद्याचा बंद मागे घ्यावा तर उद्याचा बंद आम्ही मागे जरुर घेत आहोत मात्र, राज्यभर प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात, शहरातल्या आणि गावातल्या मुख्य चौकात महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते तोंडाला काळे फीती बांधून आणि हातात काळे झेंडे घेऊन या सगळ्याचं गोष्टीचा निषेध करतील असे काल पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.
आता ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात येत आहे. संजय राऊत, अनिल देसाई यांच्यासह हजारो शिवसैनिक निषेध आंदोलनात सहभागी झाले आहेत.