Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : “मुंबईचं अदानीस्थान करणार!” उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर थेट हल्लाबोल

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी रविवारी शिवसेना भवनात संयुक्त पत्रकार परिषद घेत मुंबई महानगरपालिकेसाठीचा वचननामा जाहीर केला.
Published by :
Riddhi Vanne
Published on

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी रविवारी शिवसेना भवनात संयुक्त पत्रकार परिषद घेत मुंबई महानगरपालिकेसाठीचा वचननामा जाहीर केला. शिवसेना, मनसे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मिळून तयार झालेला हा वचननामा “शिवशक्ती वचननामा” नावाने सादर करण्यात आला. यावेळी दोन्ही ठाकरे बंधूंनी सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली.

उद्धव ठाकरे यांनी उद्योगपती गौतम अदानी यांचा उल्लेख करत भाजपवर निशाणा साधला. भाजपचा महापौर सत्तेत आला, तर मुंबईचं रूपांतर “अदानीस्थान”मध्ये होईल, असा दावा त्यांनी केला. मराठी आणि हिंदू महापौराच्या मुद्द्यावरूनही त्यांनी भाजपवर टीका केली. कोरोना काळातील उत्तर प्रदेशातील परिस्थितीचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी, तेव्हा वाहणारी प्रेतं हिंदू होती की मुस्लिम, याचं उत्तर फडणवीसांनी द्यावं, असं सांगितलं. मुख्यमंत्री असताना आपण प्रस्तावित केलेले मराठी रंगभूमी दालन, मराठी भाषा भवन, डंपिंग ग्राऊंड आणि वरळी डेअरीजवळील कामगार पुनर्वसन प्रकल्प रद्द करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

महिलांसाठी नवीन योजना राबवण्याचं आश्वासन देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबईत महिलांना रोजगारासोबत आर्थिक मदत दिली जाईल. मुंबईत उभारलेलं आर्थिक केंद्र भाजप सरकारने गुजरातला हलवलं, असा आरोप करत त्यांनी मुंबईसाठी नव्या आर्थिक केंद्राची घोषणा केली. निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर शंका व्यक्त केली. तीन लाख कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करत त्यांनी भाजप मराठी माणसाला आणि हिंदूंना न्याय देत नसल्याचं सांगितलं. या वेळी राज ठाकरे यांनीही मिश्कील टिप्पणी करत, सर्व प्रश्न एकाच पत्रकार परिषदेत विचारायचे का, असा टोला लगावला.

थोडक्यात

  1. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी रविवारी शिवसेना भवनात संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

  2. मुंबई महानगरपालिकेसाठीचा संयुक्त वचननामा जाहीर करण्यात आला.

  3. शिवसेना, मनसे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकत्रित वचननामा

  4. वचननाम्याला “शिवशक्ती वचननामा” असं नाव देण्यात आलं.

  5. मुंबईच्या विकासावर केंद्रित महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले.

  6. दोन्ही ठाकरे बंधूंनी सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com