Uddhav Thackeray
Uddhav ThackerayTeam Lokshahi

उद्धव ठाकरेंची आज महाडमध्ये सभा; कुणावर साधणार निशाणा

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत.

विकास मिरगणे, नवी मुंबई

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात संध्याकाळी महाड इथं त्यांची जाहीर सभा होणार आहे. याच सभेत महाडचे माजी आमदार काँग्रेसचे माणिक जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप आपल्या हजारो समर्थकांसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

महाड विधानसभा मतदार संघातील ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवार म्हणून स्नेहल यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांच्यासाठी मोठे आव्हान तयार करण्याची खेळी ठाकरे गटाने केली आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.

महाडच्या चांदे क्रीडांगणावर होणाऱ्या या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. सभेला शिवसेना नेते अनंत गीते, सुभाष देसाई, खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे आदी उपस्थित राहणार आहेत. या सभेत उद्धव ठाकरे कुणावर निशाणा साधतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com