Mahavikas Aaghadi Meeting : महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक, कोणत्या विषयांवर चर्चा केली जाणार?

महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक
Published by :
Team Lokshahi

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. अधिवेशन सुरु झाल्यापासून यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर वादावादी होत असलेलीदेखील बघायला मिळत आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. आता विरोधक पक्षाकडून त्यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याचीही मागणी केली जात आहे. दरम्यान आता महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक बोलावली असल्याचे समोर आले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार तर काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. मुंबईत वाय बी चव्हाण सेंटर येथे आज संध्याकाळी चार वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com