Uddhav Thackeray : "रमी आणि तीन पत्तीला ऑलिम्पिकमध्ये...", उद्धव ठाकरेंचा कोकाटेंना चिमटा

उद्धव ठाकरेंचा खोचक टोला: रमी आणि तीन पत्ती ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्याची मागणी.
Published by :
Riddhi Vanne

Uddhav Thackeray On Manikrao Kokate : आज शनिवारी 2 ऑगस्टला 'मातोश्री' येथे महाराष्ट्र शेतकरी क्रांती संघटना ठाकरे गटात विलीन झाली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थितीत होते, तसेच शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब बिलेवार त्याचबरोबर राज्य जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी पक्षात प्रवेश केला. दरम्यान उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत माणिकराव कोकाटे यांच्यांवर जोरदार टीका केली.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणााले की, "आज एक कार्टुन आले होते, आता रमी आणि तीन पत्ती या खेळाचा समावेश ऑलिम्पिकमध्ये घ्यावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. जो विषय ज्याचा आहे त्याला तसेच खाते दिले गेले आहे. उद्धव ठाकरेंचा माणिकराव कोंकाटे यांना खोचक टोला. जे कृषीमंत्री कोंकाटे शेतकऱ्यांची थट्टा आणि मस्करी करत होते, ते रमी खेळणारे क्रीडामंत्री झाले आहेत."

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com