ताज्या बातम्या
Uddhav Thackeray On Devendra Fadnavis : 'भाजप अफवांची फॅक्टरी'; उद्धव ठाकरेंचा टोला, म्हणाले...
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद देत फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्तीसंबंधीचे दोन्ही जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातच हिंदी भाषेबाबतची समिती गठीत झाल्याचे सांगितले. या सर्व बाबींवर प्रतिक्रिया देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद देत फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. भाजप ही अफवांची फॅक्टरी असल्याचं उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं आहे. तसेच ५ जुलै रोजी मोर्चा काढत नसलो तरी, जल्लोषासाठी एकत्र येण्याचा इशारा इतर पक्षांसह मनसेला दिला आहे.