Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

"४ तारखेनंतर टरबूजचा भाव उतरणार आहे"; उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका

मिंधे तुम्ही दिल्लीश्वराची चाकरी करत आहेत, हे बाळासाहेबांचे विचार आहेत का? असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली.
Published by :

Uddhav Thackeray On CM Eknath Shinde And Devendra Fadnavis : मी या सरकारला मोदी सरकार नाही, तर गजनी सरकार बोलतो. या गजनी सरकारच्या हातात तुम्ही देश देणार आहेत का? कारण उद्या कदाचित विसरून जातील. मी अक्षय कुमारला सांगतो की, तुम्ही प्रधानमंत्र्यांची पुन्हा ४ तारखेला मुलाखत घ्या. आंबा कसा खायचं विचारलं, तसं टरबूज कसा खायचा, ते विचारा. पण ४ तारखेच्या आता घ्या. कारण ४ तारखेनंतर टरबूजचा भाव उतरणार आहे. मी चपरासी झालो तरी चालेल, पण मी पुन्हा येईन, असं त्यांचं चालू आहे. मिंधे दाडी खाजवत त्यांच्या पाठी चालले आहेत आणि ते म्हणतात, बाळासाहेबांचे विचार पुढे नेणार. महाराष्ट्र तुमच्या डोळ्यादेखत लुटला जातोय, तरी मिंधे तुम्ही दिल्लीश्वराची चाकरी करत आहेत, हे बाळासाहेबांचे विचार आहेत का? असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली. ते डोंबिवलीत महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत बोलत होते.

विरोधकांवर टीका करत उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, हे तुमचं हिंदुत्व आहे का? म्हणून मी तुम्हाला जे वचन दिलं आहे, महाविकास आघाडीचं महाराष्ट्रात आणि देशात इंडिया आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणारच. इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर महाराष्ट्राची होणारी लूट मी थांबवणार. महाराष्ट्राचं लुटलेलं वैभव यांनी गुजरातला नेलं आहे, हे वैभव मी महाराष्ट्रात पुन्हा आणल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांसाठीही वचनं दिली आहेत.

शिवसेना आणि भाजप राजकारण अस्पृष्य होतो. कुणीही आपल्यासोबत यायला तयार नव्हतं. तेव्हा शिवसेनेनं तुम्हाला साथ दिली होती. त्या शिवसेनेला तुम्ही नकली म्हणताय. हे भाजपला पटतय का? अस्सल भाजपचे जे लोक आहेत, त्या विचारधारेचे जे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत संस्कारी झालेले आहेत. त्यांना हे पटतय का? आजा अशी अनेक कुटुंब आहेत, जे माझ्याशी बोलत असतात. मला सांगतात, आम्ही भरकटलेलो आहोत, आम्ही कोणत्या दिशेनं चाललोय आम्हाला कळत नाहीय. असं व्हायलं नको होतं. मी म्हटलं, हे तुमच्या लोकांनी घडवलं आहे.

पण त्या संस्कारी पिढीबाबत मला आजही आदर आहे. पण आजा ह्यांचं हे चाललंय तळ्यात मळ्यात आणि मग कुणाच्या तरी गळ्यात. एका दिवशी मला नकली संतान बोलायचं आणि दुसऱ्या दिवशी मला डोळा मारायचा. तिसऱ्या दिवशी मला नकली सेना बोलायचं. मी माणुसकी सोडली नाही. आम्ही कोणताही टोमणा मारत नाही. गेले दहा वर्ष या माणसाने झोप घेतली नाही. आपण दोन दिवस झोपलो नाही, तर झिणझिण्या वळतात. भाजपला सांगतोय की, तुम्ही एव्हढे निर्दयी होऊ नका. त्यांच्या सरकारला काल, आज, उद्या काय कळत नाही. म्हणून मी त्यांना गजनी सरकार म्हणतो, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com