Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

"देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत"; उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार

"मोदीजी सर्वशक्तीमान आणि विश्वगुरु आहात, मग तुम्हाला उद्धव ठाकरेची भीती का वाटते? आम्ही हिंदूत्व सोडलं नाही, आम्ही भाजपला सोडलं आहे"
Published by :

Uddhav Thackeray On Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेला संपवायला आता फक्त रणगाडे, अमुबॉम्ब, रॉकेट आणायचा बाकी राहिला आहे. मोदीजी सर्वशक्तीमान आणि विश्वगुरु आहात, मग तुम्हाला उद्धव ठाकरेची भीती का वाटते, आम्ही हिंदूत्व सोडलं नाही, आम्ही भाजपला सोडलं आहे. शिवसेनाप्रमुख म्हणायचे, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, मातांनो आणि भगिनींनो, हे मी सोडलेलं नाही. देशाची लढाई म्हटल्यावर, जमलेल्या माझ्या देशभक्तत बांधवांनो आणि भगिनींनो, असं म्हटलं तर आम्ही देशभक्त नाहीत का? ज्या कोणाला देशभक्त या शब्दावर आक्षेप असेल, मग ते फडणवीस असले तरी ते देशद्रोही आहेत. या देशद्रोहांना गेट आऊट करा, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

उद्धव ठाकरे विरोधकांवर टीका करत म्हणाले, आम्ही जिद्दीने ईशान्य मुंबई मागून घेतली आहे. आपल्या शिवसेनेवर त्यांनी घात केला. शिवसेना संपवायला निघाले आहेत, त्यांना राजकारणात संपवावंच लागेल. ते संपवण्यासाठी मी इथे आलो आहे. काल शिवसैनिकांनीच धाड टाकली आणि आपल्याच कार्यकर्त्यांना पकडलं. त्यांना बेदम मारहाण केली. मला पोलिसांची नावं द्या. पुढे काय करायचं ते मी बघतोच. पोलिसांनाही सांगतोय की, तुम्ही भाजप किंवा फडणवीसचे नोकर नाही आहात. तुम्ही जनतेचे सेवक आहात. तुम्ही जनतेचे मित्र आहात. हे सरकार तर पडणारच आहे. पण आमचं सरकार आल्यावर तुमचं काय करायचं, ते निर्णय मी घेतल्याशिवाय राहणार नाही, असा जाहीर इशारा उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना दिला आहे.

ठाकरे पुढे म्हणाले, लोकशाही समोर आणि जनतेसमोर तुमची मस्ती आम्ही खपवून घेणार नाही. ज्यांनी आमच्या महिला कार्यकर्त्यांवर हात उचलला आहे, त्या हाताचं काय करायचं, ते मी सरकार आल्यावर बघून घेतो. हा इशारा मी पोलिसांना देतोय. काल शिवतीर्थावर मोदीजी येऊन गेले. ते आता भरकटलेले आहेत. मोदी भ्रमिष्ट झाल्यासारखे बोलत आहेत. मला नकली संतान म्हणतात. शिवसेनेला नकली सेना म्हणतात. काँग्रेसच्या जाहीरनाम्याला मुसलमानांचा जाहीरनामा म्हणतात. काल तर त्यांनी कहरच केला. काल ते म्हणाले, हा माओवादी जाहीरनामा आहे. निवडणूक रोख्यांकडून तुम्हाला पैसा बघितला तर तुमचा जाहीरनामा हा खाओवादी आहे.

आमचं सरकार आल्यावर मुंबई आणि महाराष्ट्राच्या लुटारूंना तडीपार केल्याशिवाय राहणार नाही. हे मुंबई आणि महाराष्ट्राचे लुटारू आहेत. आमच्यासोबत मुस्लिम आहेत, म्हणून मोदीजी तुमच्या पोटात दुखतंय. पण तुम्ही ज्यांना सोबत घेतलंय, त्यांच्यामध्ये उत्तर भारतीय आणि जैन आहेत, त्याचं काय होणार आहे? ते हिंदू नाही आहेत का? त्यांच्यावर दगड मारणारी लोक तुम्ही सोबत घेतले आहेत, त्यांचं काय होणार? कारण तुम्ही त्यांच्यावर कारवाई करु शकत नाहीत. देशाचे प्रधानमंत्री घटनाबाह्य मुख्यमंत्र्याला सोबत घेऊन फिरत आहेत, असं लाजिरवाणं चित्र संपूर्ण जगात कुठेही नसेल. ते आपल्याला महाराष्ट्रात पाहावं लागत आहे. यांना आता पराभवाचं भूत समोर दिसायला लागलं आहे. जनतेचा आम्हाला पाठिंबा असल्याने उद्धव ठाकरेंची त्यांना भीती वाटत आहे, असंही ठाकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com