Uddhav Thackeray On Eknath Shinde
Uddhav Thackeray On Eknath Shinde

"आम्ही देशभक्त आहोत, मोदीभक्त नाही", उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर पलटवार

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात माझ्या तमात हिंदू बांधव आणि भगिनींनो असे शब्द न वापरल्याने विरोधकांनी त्यांना धारेवर धरलं होतं.
Published by :

दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात इंडिया आघाडीची महासभा काल रविवारी पार पडली. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात माझ्या तमात हिंदू बांधव आणि भगिनींनो असे शब्द न वापरल्याने विरोधकांनी त्यांना धारेवर धरलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आज पत्रकार परिषदेत याच मुद्द्यावरून टीका केली. अशातच उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर पलटवार केला आहे. आता हे बोलल्यावर भाजपचे खुळखुळे वाजायला लागले आहेत. आता मोदीभक्त ओरडू लागले आहेत की, उद्धव ठाकरेंची भाषा बदलली. मला त्या मोदी भक्तांना विचारायचंय, तुम्ही देशभक्त नाही आहात का? आम्ही देशभक्त आहोत. इथल्या सभेत आलेले मुस्लिम बांधवही देशभक्त आहेत, असं म्हणत ठाकरे यांनी मोदी सरकारसह शिंदे गटावर टीका केलीय.

ठाकरे पुढे म्हणाले, ज्या भाजपच्या नेत्यांनी माझ्यावर टीका केलीय, त्यांना माझा थेट सवाल आहे, तुम्ही मोदीभक्त आहात की देशभक्त आहात. आम्ही देशभक्त आहोत. यात लाज वाटण्याचं काही कारण नाही. लाज त्यांना वाटली पाहिजे. कारण त्यांनी देशभक्त या शब्दावर आक्षेप घेतला आहे. आम्ही देशप्रेमी आहोत. त्यांच्या डोक्यात काय किडे वळवळत आहेत, हे आता तुम्हाला कळलं असेल. आता तुमच्या गावात मोदी सरकारचा तो रथ आला तर तिथल्या तिथे आडवा आणि पोलिसांनी कारवाई केली नाही तर तुम्ही करा.

आता आचारसंहिता लागली आहे, आता मोदी आणि आपण एकसारखे आहोत. त्यांना वेगळं आणि आपल्याला वेगळं, असं चालणार नाही. खपवून घ्यायचं नाही. जर त्यांना प्रचार करायचा असेल, तर हा सर्व खर्च त्यांच्या खात्यात लावला गेला पाहिजे. जे गोरगरिब लोक मात्रोश्रीवर येतात त्यांना मी भेटतो. प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या असतात, कुणाच्या शेतीच्या असतात, कुणाच्या कर्जाच्या तर कुणाच्या राजकीय समस्या असतात. त्या समस्या बघून मी घरी बसलो नाही. मी संपूर्ण राज्यभर फिरतोय. कारण ही लढाई आपल्याला जिंकायची आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com