Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

"भाजप सरकारच्या नादानपणामुळे भारतीय सैनिकांवर हल्ला झाला"; 'मशाल' पेटवून उद्धव ठाकरेंचं PM मोदींवर शरसंधान

तुम्ही माझं चिन्ह चोरलं, पण तुम्ही माझं नाव चोरू शकत नाही. मी निवडणूक आयोगाला धोंड्या नावा ठेवलं आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तोफ डागली.
Published by :
Naresh Shende
Published on

Uddhav Thackeray On Narendra Modi : तुम्ही ३७० कलम हटवलं, तेव्हा मी जाहीर पाठिंबा दिला होता, पण त्याच काश्मीरमध्ये जवानांवर हल्ले होत आहेत. आजही तुम्ही काश्मीरला सुरक्षा देऊ शकत नाही. सैन्य आपल्या देशासाठी प्राणाची आहुती देतात. पण तुमच्या नादानपणामुळे या जवानांना जीव गमवावा लागला. सत्यपाल मलिकांनी जे उघड केलं आहे, त्याबद्दल तुम्ही का बोलत नाही. जो कामाचा नाही, तो रामाचा कसा होईल, जिथे आनंदी आनंद आहे, महिला सुरक्षीत आहेत, त्याला आम्ही रामराज्य म्हणतो. आमचं सरकार आल्यावर ८० कोटी लोकांना नोकरी देण्याचं स्वप्न आम्ही बघतोय. आमचं हिंदुत्व म्हणजे हृदयात राम आणि हाताला काम असं आहे. मी या सरकारला गजनी सरकार म्हणतो. यांना काल काय बोलले, ते आज आठवत नाही. निवडणूक आयोग यांचं धुणीभांडी घासत आहे. तुम्ही माझं चिन्ह चोरलं, पण तुम्ही माझं नाव चोरू शकत नाही. मी निवडणूक आयोगाला धोंड्या नावा ठेवलं आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तोफ डागली. ठाकरे राजन विचारे यांच्या प्रचारसभेत नवी मुंबई येथे बोलत होते.

उद्धव ठाकरे भाजप सरकारवर टीका करताना म्हणाले, तुम्ही खोट काम केल्यावर आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो. कोश्यारी म्हणजे तुमचा दुसरा नोकर, कोश्यारींनाही सर्वोच्च न्यायालयाने सुनावलं. कोश्यारींनी कसं चुकीचं काम केलं, ते सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं. नरेंद्र मोदी नकळत सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणत आहेत, असा मी जाहीर आरोप करत आहे. तुम्ही आम्हाला नकली शिवसेना म्हणत आहात, म्हणजे तुम्ही सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणत आहात. तुम्ही माझा धनुष्यबाण चोरला, गद्दाराला दिला.आता महाराष्ट्र तुमची पंतप्रधानपदाची खूर्ची खेचल्याशिवाय राहणार नाही. तमाम महाराष्ट्राने ठरवलं या कमळाबाईला एकही जागा द्यायची नाही, मग महाराष्ट्रात आपोआप यांचं सरकार गाडलं जाईल. महाराष्ट्रातील उद्योगधंदे तुम्ही गुजरातला नेले.

लोकमान्य टीळकांनाही महाराष्ट्राचा अभिमान वाटत असेल, माझा महाराष्ट्र आजही जागा आहे. संपूर्ण देशात असंतोष भडकला आहे, त्याचा जनक हा महाराष्ट्र आहे. आजच्या सरकारला डोकं नाही, डोक्याच्या जागी नुसतं खोकं आहे. हे खोकेबाज सरकार आहे, डोकेबाज नाही. माझी शिवसेना ही वडिलोपार्जित संपत्ती आहे. हे माझे निवडणूक रोखे आहेत. निवडणूक रोखे बोगस निघणार नाहीत. हे सर्व अस्सल मर्द, जीवाला जीव देणारे शिवसैनिक आहेत. मोदी बोलले, उद्धवजींबद्दल मला प्रेम आहे.

भाजपने २०१४ ला नरेंद्र मोदींचं नाव पंतप्रधानपदासाठी सुचलं. त्यावेळी राजनाथ सिंग यांनी मला विचारलं होतं, उद्धवजी तुमचा काय सल्ला आहे, ते पाप मी केलं होतं. ते पाप माझ्याकडून नकळत झालं होतं. तेव्हा उद्धव ठाकरे तुम्हाला माहित होतं. मग आजा काय बिनसलं? माझ्या असली शिवसेनेला हे नकली म्हणतात. आमचं नाणं खणखणीत आहे. मोदींचं नाणं महाराष्ट्रात चालत नाही, म्हणून हे माझ्या वडीलांचा फोटो लावतात. इथले गद्दार आहेत, घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांनी त्यांच्या वडीलांचा फोटो लावून निवडणुका लढवाव्यात. काश्मीरमध्ये पुन्हा हल्ला झाला.

शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना. काही जणांना असं वाटतय ठाणे आमची खासगी मालमत्ता आहे. त्यांची मस्ती उतरवायला मी आलो आहे. महाराष्ट्रात जिथे जिथे शक्य आहे, तिथे मी जातोय. लोक पेटलेत आणि चिडलेत, लोक वाट बघत आहेत, कधी मतदानाची तारीख येते आणि यांना तडीपार करण्याची संधी मिळते. माझा शिवसैनिक निष्ठावान आहे. तुमच्या पैशाने तो विकत घेतला जाणार नाही. ज्यांनी माझ्या मढवीला तुरुंगात टाकलं, त्यांना मी तुरुंगात टाकलं आहे. तुमच्या तुरुंगाच्या भिंती किती जाड आहेत, मी पण बघतो, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी विरोधकांना दिला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com