Uddhav Thakyre : 'प्रभू रामाच्या पावलावर पाऊल ठेवून भाजपने चालावं'

भाजपचा वर्धापन दिन तिथीप्रमाणे, तारखेप्रमाणे की सोयीप्रमाणे आहे?, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या वर्धापनदिनी शुभेच्छा देलातान केली.
Published by :
Rashmi Mane

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नव्याने स्थापन झालेल्या ‘शिव संचार सेने’च्या बोधचिन्ह आणि नामफलकाचे उद्घाटन रामनवमी दिनानिमित्त मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना राज्यसंघटक अखिल चित्रे तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

दरम्यान, यावेळी भाजपच्या वर्धापनदिनानिमित्त उद्धव ठाकरेंनी शुभेच्छा देताना म्हटले की, "रामनवमी असल्याने वर्धापन दिन भाजप साजरा करते आहे का?, रामाच्या पावलावर पाऊल ठेवून चाला. वक्फ बोर्डाच्या विधेयकाबाबत जर काँग्रेसला कोर्टात जायचं असेल तर ठीक आहे. आम्ही (शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे) कोर्टात जाणार नाही," असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com