Uddhav Thackeray On Mahayuti : नाशिकच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आक्रमक "हिंदुत्व मी सोडलं की.."
शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) राज्यभरात होणाऱ्या विभागीय शिबिरांची सुरुवात आज नाशिकपासून झाली. या शिबिरात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप पक्षावर जोरदार टीका केली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, "शिवसेनेला 50 वर्ष झाली. त्यावेळेस रक्तदानाचा विश्वविक्रम केला आहे. भाजपाचे लोक करतील गोमूत्र वाटपाचा कार्यक्रम करतील. तसेच भाजपने फेक नॅरेटिव्ह केलं आहे की, शिवसेनने हिंदुत्व सोडलं. मुस्लिम आमच्या सोबत का आला कारण कोरोनात भेदभाव केला नाही. मुख्यमंत्री असतांना समांतर न्याय दिला. आज भारतीय जनता पक्ष करतंय हे मला सांगा हिंदुत्व मी सोडलं की भाजपाने".
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, "शिवसेनने वक्फ विधेयकाला विरोध केला. हिंदुत्वाचा आणि वक्फचा काडीचा संबंध नाही. जे लोक सांगत होते मुस्लिमांचे रक्षण करू सांगतील त्यावर हे भाजपचे लोक हसत होते. शिवसेनेचा कार्यक्रम होऊ नये म्हणून नाशकात मुहूर्त काढला. कोण मरतय, हिंदू आणि मुस्लिम. शिवसेनने आम्हाला शिकवलं धर्म घरात ठेवावा, बाहेर पडल्यावर देश असावा. धर्म बाहेर दाखविला तर कर्मठ हिंदू म्हणून समोर जाईल. 32 लाख मुस्लिम कुटुबांना सौगात हे मोदी केलं, हिंदूंना दिली घंटा यांना देता सौगात आंनद आहे. भाजप बिहारच्या निवडणूकमध्ये 'बटेनगे तो कंटेंगे' ची भूमिका करत आहे. भगवा ही आमची ओळख आहे. 'आम्ही हिंदू मराठी, महाराष्ट्रात मराठी, देशात हिंदू आहोत हे माझं वाक्य नाही आहे' शिवसेना प्रमुखांचे वाक्य आहे".