CM Uddhav ThackerayTeam Lokshahi
बातम्या
उद्धव ठाकरे यांचा बारसू दौरा; मात्र सभेची परवानगी पोलिसांनी नाकारली
रत्नागिरीतील बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
रत्नागिरीतील बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाने प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांना पाठिंबा दिलाय. उद्धव ठाकरे उद्या 6 मे ला बारसूला जाणार आहेत.
मात्र आता उद्धव ठाकरेंच्या सभेची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे. ठाकरे गटाने रानतळे येथे सभेचे नियोजन केले होते. मात्र आता सभेची परवानगी नाकारल्यामुळे आता ठाकरे गटाची यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.