मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात उद्धव यांचा पहिलाच दौरा होणार

मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात उद्धव यांचा पहिलाच दौरा होणार

ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांची २७ जानेवारी रोजी जयंती आहे.

ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांची २७ जानेवारी रोजी जयंती आहे. यानिमित्ताने २६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्यावतीने महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यातील जांभळीनाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात हे शिबीर होणार आहे. या शिबिराचे उद्घाटन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

याच पार्श्वभूमीवर सहा महिन्यांचा काळ लोटला तरी उद्धव ठाकरे यांनी ठाणे शहराचा दौरा केला नव्हता. त्यामुळे त्यांचा दौरा कधी होणार आणि ते शिवसैनिकांना काय संबोधित करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. असे असतानाच गुरुवारी त्यांचा ठाणे दौरा निश्चित झाला आहे. सध्या मुख्यंमत्री शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात उद्धव यांचा पहिलाच दौरा होणार असून या दौऱ्यात ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com