ताज्या बातम्या
उद्धव ठाकरे यांचा लवकरच कोकण दौरा, दिल्या महत्त्वाच्या सूचना
काही दिवसांपूर्वी आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत धनुष्यबाण हाती घेतले.
एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगर'मुळे उद्धव ठाकरेंच्या कोकणातील ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले. काही दिवसांपूर्वी आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत धनुष्यबाण हाती घेतले. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे कोकणात असलेले एकमेव आमदार भास्कर जाधव हे देखील उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार असल्याच्या अनेक चर्चा सुरु झाल्या.
या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे कोकण दौरा करणार असल्याचे समोर आले आहे. नव्या लोकांना सोबत घेऊन संघटना उभी करण्याच्या सुचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. वैभव नाईक व उद्धव ठाकरे यांची कालच भेट झाली. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पहिल्यांदाच दोघांची भेट झाली. यावेळी "माझ्यावर कुठलाही दबाव नाही, माझी भूमिका स्पष्ट मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार", असे स्पष्ट मत वैभव नाईक यांनी स्पष्ट केले.