Uddhav Thackeray : 'हुतात्मा स्मृती दिना'निमित्त उद्धव ठाकरे यांचे हुतात्मा चौकात अभिवादन
(Uddhav Thackeray ) हुतात्मा दिन या पार्श्वभूमीवर रात्री अकरा वाजता उद्धव ठाकरे हे हुतात्मा चौकात अभिवादन केले आहे. २१ नोव्हेंबर हा दिवस 'हुतात्मा स्मृती दिन' म्हणून साजरा केला जातो. संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी ज्या १०७ हुतात्म्यांनी आपले प्राण गमावले, त्या सर्वांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा दिवस आहे. या दिवशी महाराष्ट्र सरकारने संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांच्या त्यागाची आठवण केली जाते. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई न देण्याचे सांगितल्याने महाराष्ट्रात असंतोष होता.
मात्र सामान्यांना, महाराष्ट्रातील जनतेला मुंबईसह महाराष्ट्र हवा होता. 21 नोव्हेंबर 1956 दिवशी फ्लोरा फाऊंटन परिसरामध्ये या मागणीसाठी विशाल मोर्चा निघाला होता. फोर्ट भागात त्या वेळेस संचारबंदी असूनही मोठ्या प्रमाणात लोकं जमल्याने सत्याग्रहींवर लाठीमार करण्यात आला होता. फ्लोरा फ्लाऊंटन परिसरात गोळीबार झाला आणि 107 जणांचे जीव गेले होते.
थोडक्यात
हुतात्मा दिन या पार्श्वभूमीवर रात्री अकरा वाजता उद्धव ठाकरे हे हुतात्मा चौकात अभिवादन केले आहे.
२१ नोव्हेंबर हा दिवस 'हुतात्मा स्मृती दिन' म्हणून साजरा केला जातो.
संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी ज्या १०७ हुतात्म्यांनी आपले प्राण गमावले.
त्या सर्वांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा दिवस आहे.
