मुदत संपल्यावर खरंच उद्धव ठाकरेंचं पक्षाध्यक्षपद जाणार; शिवसेनेच्या पक्षघटनेत याबाबत नेमके काय?

मुदत संपल्यावर खरंच उद्धव ठाकरेंचं पक्षाध्यक्षपद जाणार; शिवसेनेच्या पक्षघटनेत याबाबत नेमके काय?

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची २३ जानेवारी २०१८ रोजी पक्ष प्रमुख पदावर निवड करण्यात आली होती.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची २३ जानेवारी २०१८ रोजी पक्ष प्रमुख पदावर निवड करण्यात आली होती. येत्या २३ जानेवारी रोजी उद्धव ठाकरेंची पक्ष प्रमुखपदाची मुदत संपत आहे. शिवसेनेच्या घटनेनुसार पक्षात शिवसेनाप्रमुख हे एकच सर्वोच्च पद आहे. या पदावर बाळासाहेब ठाकरे होते आणि आजन्म तेच राहतील अशी भूमिका घेण्यात आली होती. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर पक्ष प्रमुखपद उद्धव ठाकरेंनी निर्माण केलं. मात्र याला शिंदे गटाकडून बेकायदा असल्याचे म्हटले जात आहे.

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचीही निवड पाच वर्षांसाठीच केली जाते. या कार्यकारिणीमध्ये एकूण १९ सदस्य असतात. त्यापैकी १४ सदस्यांची प्रतिनिधी सभा तयार होते असं पक्षघटनेत नमूद करण्यात आलं आहे. पण आता राष्ट्रीय कार्यकारिणीचीही मुदत संपल्यामुळे २३ जानेवारीनंतर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुखपदी पुन्हा निवड करायची असल्यास त्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणीलाही मुदतवाढ मिळणं गरजेचं आहे. यासंदर्भातली मागणीही ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.

शिवसेनाप्रमुख हे पक्षाचे अध्यक्ष असतील. त्यांची निवड ही पक्षाच्या प्रतिनिधी सभेकडून केली जाईल. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमधील निवडक सदस्य प्रतिनिधी सभेवर असतात. पक्ष प्रमुखांची निवड पाच वर्षांसाठी केली जाते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com