Udit Narayan Kiss Controversy: उदित नारायण यांनी भर कार्यक्रमात महिला फॅनला केलं किस
"पापा केहते हैं बडा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा..." हे गाणं गात तमाम जनतेच्या मनात आशेची स्वप्न जागवणारे उदित नारायण. 80s-90s चे दशक गाजवणारे उदित नारायण यांनी लाईव्ह शो दरम्यान केलेल्या एका कृत्यामुळे त्यांना समाजाच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.
ज्येष्ठ गायक उदित नारायण यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये उदित नारायण लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान एका महिला चाहत्याचे चुंबन घेताना दिसत आहेत. त्यामुळे आता सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटत आहेत.
नेमकं काय घडलं?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार "टीप टीप बरसा पानी..." हे गाणं उदित नारायण गात होते. यावेळी प्रेक्षकांमधील एक चाहती पुढे आली. आणि तिने सेल्फी घेण्यासाठी म्हणून पुढे आली. त्यानंतर तिने उदित नारायण यांच्या गालावर किस करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, उदित नारायण यांनी तिच्या ओठांवर चुंबन केलं. या घटनेनंतर प्रेक्षक अचंबित झाले.
उदित नारायण यांची प्रतिक्रिया
हिंदुस्तान टाईम्सला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत उदित नारायण यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. उदित नारायण यांना संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया विचारली असता, "हम सभ्य लोग है," ही सर्व चाहत्यांची क्रेझ आहे, याकडे इतके लक्ष दिले जाऊ नये," असं उदित नारायण म्हणाले.
तो म्हणाला, "फॅन्स इतके दिवाने असतात. आम्ही असे नाही आहोत, आम्ही सभ्य लोकं आहोत. काही लोकं अशा गोष्टींचं धाडस दाखवतात आणि आपलं प्रेम दर्शवतात. गर्दीत खूप लोकं असतात आणि आमचे बॉडीगार्ड्सही असतात. तरीही चाहत्यांना असे वाटते की त्यांना भेटण्याची संधी मिळते, म्हणून कोणी हस्तांदोलनासाठी हात पुढे करतात, कोणी हातांचे चुंबन घेतो... ये सब दिवांगी होती है (ही सर्व चाहत्यांची क्रेझ आहे. इतके लक्ष दिले जाऊ नये).
उदित नारायण हे एक प्रसिद्ध ज्येष्ठ गायक आहेत. त्यांनी तेलुगू, कन्नड, तमिळ, बंगाली, सिंधी, ओडिया, भोजपुरी, नेपाळी, मल्याळम आणि आसामी यासह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये, कयामत से कयामत तक, रंगीला, पुकार, धडकन, लगान, देवदास, वीर-झारा आणि स्टुडंट ऑफ द इयर यांसारख्या चित्रपटांमधील त्यांची गाणी विशेष लोकप्रिय ठरली आहेत.