Ulhasnagar Crime
Ulhasnagar Crime

Ulhasnagar Crime : अनैतिक संबंधाच्या संशयातून लहान भावानेच मोठ्या भावाची हत्या

अनैतिक संबंधाच्या संशयातून भावानेच भावाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उल्हासनगर शहरातील शहाड भागातील एका कॉलनीमध्ये घडली आहे.

उल्हासनगर : मयुरेश जाधव | वहिनीशी अनैतिक संबंधाच्या संशयातून लहान भावानेच मोठ्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली असून याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात सख्ख्या भावावर हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Ulhasnagar Crime
MP Bus Sidhi Accident : अमित शाहंच्या सभेतून परतणाऱ्या बसची ट्रकला धडक, 8 ठार, 50 जण जखमी

उल्हासनगर कॅम्प नं-1 शहाड फाटक परिसरात रोहित रमेश कांगोरे व अमित रमेश कांगोरे हे भाऊ कुटुंबासह राहतात. शुक्रवारी दुपारच्या सुमारास दोन्ही भावात तू तू मैं मैं होऊन रागाच्या भरात अमित याने जातेचा दगड मोठा भाऊ रोहित याच्या डोक्यात घातला. याप्रकारने बेशुद्ध झालेल्या रोहित याला मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून रोहित याचा मृत झाल्याचे सांगितले. उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फुलपगारे यांनी तपासाचे चक्र जलद फिरवीत आरोपी भाऊ अमित कांगोरे याला अटक केली. अनैतिक संबंधाच्या संशयातून लहान भावनेच मोठ्या भावाचा खून केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फुलपगारे यांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com