Under 19 World Cup schedule
Under 19 World Cup scheduleUnder 19 World Cup schedule

Under 19 World Cup schedule : वर्ल्डकप शेड्यूल आउट! भारत–पाक भिडतायत का नाही, जाणून घ्या....

आयसीसी अंडर 19 वर्ल्डकप 2026 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये असणार की नाही याबाबत क्रिकेट प्रेमींच्या मनात असलेल्या शंकेचा निरसन झाला आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

आयसीसी अंडर 19 वर्ल्डकप 2026 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये असणार की नाही याबाबत क्रिकेट प्रेमींच्या मनात असलेल्या शंकेचा निरसन झाला आहे. आयसीसीने दोन्ही संघांना वेगळ्या गटात ठेवले आहे, त्यामुळे या स्पर्धेत दोन्ही संघांची साखळी फेरीत कोणतीही सामन्यात टक्कर होणार नाही. मात्र, दोन्ही संघ बाद फेरीत भिडू शकतात.

आयसीसी अंडर 19 मेन्स वनडे वर्ल्डकप 2026 जानेवारी महिन्यात सुरू होईल आणि 6 फेब्रुवारीला अंतिम सामना होईल. या स्पर्धेत एकूण 16 संघांचा समावेश असून त्यांची चार गटांमध्ये विभागणी केली आहे. भारताला गट 'अ' मध्ये स्थान मिळाले आहे, जिथे त्यासोबत न्यूझीलंड, बांगलादेश आणि अमेरिका देखील आहेत. भारताचा पहिला सामना अमेरिकेसोबत होणार आहे. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी सांगितले की, अंडर 19 वर्ल्डकप ही स्पर्धा भविष्यातील क्रिकेट सुपरस्टार्ससाठी एक महत्त्वपूर्ण मंच आहे. यापूर्वी ब्रायन लारा, विराट कोहली, केन विल्यमसन यासारख्या खेळाडूंनी या स्पर्धेत चमक दाखवली आहे.

स्पर्धेतील गटांची विभागणी अशी आहे:

  • गट अ: भारत, न्यूझीलंड, बांगलादेश, अमेरिका

  • गट ब: पाकिस्तान, इंग्लंड, झिम्बाब्वे, स्कॉटलंड

  • गट क: ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, श्रीलंका, जपान

  • गट ड: टांझानिया, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका

  • या स्पर्धेची उत्सुकता अधिक वाढली आहे, कारण आगामी क्रिकेट सुपरस्टार्स यामध्ये दिसतील.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com