संगमनेरमध्ये शॉक लागून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू

संगमनेरमध्ये शॉक लागून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू

संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खंदरमाळवाडी परिसरातील वांदरकडा येथील छोट्याशा तळ्यात आंघोळीसाठी गेलेल्या चार मुलांना विजवाहक तारेचा शॉक लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Published by :
shweta walge

आदेश वाकळे, संगमनेर : संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खंदरमाळवाडी परिसरातील वांदरकडा येथील छोट्याशा तळ्यात आंघोळीसाठी गेलेल्या चार मुलांना विजवाहक तारेचा शॉक लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी मृत्यूने पठारभागासह तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. अनिकेत आरूण बर्डै, ओंकार अरुण बर्डै, दर्शन अजित बर्डै, विराज अजित बर्डै अशी मृत्यू झालेल्या चारीही मुलांचे नावे आहेत.

अनिकेत आरूण बर्डै,ओंकार अरुण बर्डै, दर्शन अजित बर्डै, विराज अजित बर्डै हे चौघे मुले खंदरमाळवाडी गावांतर्गत असलेल्या वांदरकडा येथील छोट्याशा तळ्यात आंघोळीसाठी गेले होते. त्याच दरम्यान विजवाहक तारेचा शॉक लागून या चारीही लहाण मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याघटनेची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, अशोक वाघ, रामनाथ कजबे, यांनीही घटनास्थळी धाव घेतली. नंतर जनार्दन आहेर यांच्यासह नागरिकांनी या चारीही मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आहे. पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घारगाव पोलीस स्टेशनचे साहयक फौजदार राजू खेडकर, पोलीस नाईक राजेंद्र लांघे, हरिश्चंद्र बांडे, प्रमोद चव्हाण यांनीही घटनास्थळी धाव घेतली होती.

चारीही मुलांच्या दुर्दैवी मृत्यूने पठारभागासह तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर चारीही मुलांच्या दुर्देवी मृत्यूने अनेकांना अश्रु अनावर झाले होते. तर आई- वडीलांनी हंबारडा फोडला होता. पावसामुळे रस्ता खराब झाल्याने चारीही मुलांचे मृतदेह झोळीच्या माध्यमातून नागरिकांनी रुग्णवाहिके पर्यंत नेले होते. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी विजवितरण कंपनीच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला आहे.

संगमनेरमध्ये शॉक लागून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू
जखमी गोविंदा प्रथमेश सावंतचा मृत्यू
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com