काँग्रेस नेत्यांनी भ्रष्टाचारावर बोलण्यापूर्वी 'डेटॉल'नं तोंड धुवून यावं - अर्थमंत्री निर्मला सीतारमण

काँग्रेस नेत्यांनी भ्रष्टाचारावर बोलण्यापूर्वी 'डेटॉल'नं तोंड धुवून यावं - अर्थमंत्री निर्मला सीतारमण

लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 वर सर्वसाधारण चर्चा सुरु होती.

लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 वर सर्वसाधारण चर्चा सुरु होती. या चर्चेदरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काँग्रेसवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. सीतारमण म्हणाल्या की, फेब्रुवारी 2023 मध्ये पंजाब सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 90 पैशांची वाढ केली. या किमती कमी होत नाही. केरळमध्येही त्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील सेस 2 रुपयांनी वाढवला. असे त्या म्हणाल्या.

पुढे त्यांनी म्हटले की, काँग्रेस नेत्यांनी भ्रष्टाचारावर बोलण्यापूर्वी 'डेटॉल'नं तोंड धुवून यावं. असे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींच्या सरकारनं नोव्हेंबर 2021 आणि जून 2022 मध्ये दोनदा पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करून लोकांना दिलासा दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com