केंद्रीय मंत्री अमित शहा रविवारी पुण्यात, शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे करणार लोकार्पण

केंद्रीय मंत्री अमित शहा रविवारी पुण्यात, शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे करणार लोकार्पण

केंद्रीय मंत्री अमित शहा येत्या रविवारी पुणे शहराच्या दौऱ्यावर आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

अमोल धर्माधिकारी, पुणे

केंद्रीय मंत्री अमित शहा येत्या रविवारी पुणे शहराच्या दौऱ्यावर आहेत. पुण्यातील आंबेगाव नरे या ठिकाणी साकारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे ते लोकार्पण करणार आहेत. सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास अमित शहा यांच्या हस्ते या शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होईल. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा आणि इतर उपस्थित राहणार आहेत.

पुण्यातील आंबेगाव परिसरात, दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून शिवसृष्टी साकारली जात आहे. 21 एकर परिसरात असलेल्या या ठिकाणी शिवप्रेमींना ऐतिहासिक थीम पार्क ची सफर करता येणार आहे. शिवाजी महाराजांची आग्रा येथून झालेली सुटका हे प्रसंग थ्रीडी तंत्रज्ञान वापरून साकारण्यात आले आहे. याशिवाय महत्त्वाच्या किल्ल्यांचे व्हर्च्युअल रियालिटी द्वारे होणारे दर्शन, शिवकालीन शस्त्रागार, प्रतापगडावरील भवानी मातेचे मंदिर, अश्व शाळा, राजवाडा, नगरखाना या ठिकाणी पाहण्यासाठी मिळणार आहेत.

यातील पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झालं आहे. इतर रविवारी या पहिल्या टप्प्याच्या कामाचं लोकार्पण केलं जाणार आहे. त्यानंतर एक डिसेंबर पासून शिवसृष्टीचा हा पहिला टप्पा शिवप्रेमींना पाहण्यासाठी खुला होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com