Amit Shah : केंद्रीय मंत्री अमित शाह 'या' दिवशी येणार मुंबई दौऱ्यावर

Amit Shah : केंद्रीय मंत्री अमित शाह 'या' दिवशी येणार मुंबई दौऱ्यावर

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published on

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया देखील येत असतात. यातच आता केंद्रीय मंत्री अमित शाह पुढील आठवड्यात मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 1 ऑक्टोबरला मुंबईला येणार असून मुंबईतील सुमार कामगिरी असलेल्या मतदारसंघांचा अमित शाह आढावा घेणार असल्याची माहिती मिळत आहे. दादर येथील योगी सभागृहात अमित शाह मुंबईतील सर्व 36 विधानसभा मतदारसंघांतील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत.

मुंबईतील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत शाह संवाद साधणार आहेत. पुढील तीन दिवस मतदारसंघ पिंजून काढण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अमित शाह यांनी नुकताच विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात दौरा केला.

मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघांचा 3 दिवसांत एक रिपोर्ट तयार केला जाणार असून हा रिपोर्ट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सादर केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. महायुतीच्या जागावाटपावर अंतिम चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून महायुतीच्या नेत्यांसोबतही अमित शाह चर्चा करणार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com