खासदारने खिलाया हुआ मोदक मिठा, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची प्रतिक्रिया
Team Lokshahi

खासदारने खिलाया हुआ मोदक मिठा, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची प्रतिक्रिया

ये ताे अभी झाकी है, पिक्चर अभी बाकी है, खासदार श्रीकांत शिंदे यांचं स्पष्टीकरण

अमझद खान |कल्याण : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या डाेंबिवलीतील निवासस्थानी भेट दिली. खासदार शिंदे यांनी ठाकूर यांना माेदक खाऊ घातला. तसेच जयश्रीराम लिहिलेल्या शालीने सत्कार केला. माेदक खाफी मिठा था अशी प्रतिक्रिया ठाकूर यांनी दिली. इतकेच नाही, जे 12 खासदार आमच्यासाेबत आहेत त्यांना संधी दिली जाईल असे खासदार शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

कल्याण-डोंबिवलीतील दौऱ्यावर केंद्रीय क्रिडा मंत्री अनुराग ठाकूर यांचे आगमन झाले आहे. त्यांचे जंगी स्वागत कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. त्यांच्या चहापानाचा कार्यक्रमात खासदारांनी ठाकूर यांना मॅन्गो फ्लेवरचा मोदक खाऊ घातल्याने खासदारने खिलाया हुआ मोदक बहुत मिठा था अशी प्रतिक्रिया ठाकूर यांनी व्यक्त केली. त्यावर पत्रकारांनी आत्ता तुमची युती झाली असल्याने आत्ता असे बोलता का असा प्रश्न उपस्थित केला असता ठाकूर यांनी युती तो हमारी पहिले थी असे उत्तर दिले. तसेच मोदक मिठा था, उसमे आप मिर्च मसाला ना ढूंढे अशी मिश्कील भाष्य केले.

या पूर्वीही मी महाराष्ट्र दौऱ्यावरआलेलो होतो. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, त्यांची कन्या पंकजा मुंडे यांनीही मला मोदक खाऊ घातला आहे. याचाही आवर्जून उल्लेख करीत मोदक खाण्याची ही माझी पहिली वेळ नाही असे ठाकूर यांनी स्पष्ट केले.

आगामी निवडणूकीवर खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया

अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यानंतर सर्व चर्चांना विराम लागला आहे. आगामी निवडणूका शिवसेना भाजप युतीत लढणार आहे. शिंदे फडणवीस यांच्या नेतृत्वात पुढील निवडणूका हाेणार. जे खासदार आमच्या साेबत आहेत त्या 12 खासदारांना संधी दिली जाईल. हे सर्व मिर्च मसाला लावून मिडीया करते आहे. विधान कल्याण लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला आहे.

ये तो अभी झाकी है पिक्चर अभी बाकी है, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधकांना टोला

राज्यात जे सरकार आले ते मेजाॅरिटीचे सरकार आहे. बाहेर बसून दुसऱ्या गाेष्टीच नाही. त्यांना स्वपनात पण शिंदे साहेब दिसताहेत. शिंदे साहेब गणेशाेत्सवात फिरले. फक्त गणेशाेत्सवात नाही. शासकीय काम करुन निर्णय घेतात. या सगळ्या गाेष्टीत डाेळ्यात खुपायला सुरुवात झाली आहे. हे ताे अभी झाकी है, पिक्चर अभी बाकी है.

खासदारने खिलाया हुआ मोदक मिठा, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची प्रतिक्रिया
'बाळासाहेब ठाकरेंचे पुत्रच हिंदूंच्या सणाला विरोध करतात, जनता माफ करणार नाही'
Lokshahi
www.lokshahi.com