Kiren Rijiju On Waqf Bill :  केंद्रीय मंत्री किरण रिजीजूंकडून वक्फ बोर्ड विधेयक सादर, विधेयकात काय?

Kiren Rijiju On Waqf Bill : केंद्रीय मंत्री किरण रिजीजूंकडून वक्फ बोर्ड विधेयक सादर, विधेयकात काय?

वक्फ विधेयक 2024: किरेन रिजिजूंकडून लोकसभेत सादर, विरोधकांवर टीका आणि सुधारणा महत्त्वाचे का?
Published by :
Prachi Nate
Published on

आज लोकसभेत वक्फ (सुधारणा) विधेयक 2024 वर चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय संसदीय मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक लोकसभेत मांडले आहे. आपल्या भाषणादरम्यान किरेन रिजिजू यांनी विधेयकाच्या विरोधात असलेल्या विरोधकांवर टीका केली आणि शिफारस केलेले सुधारणा सादर करणे का महत्त्वाचे आहे यावर प्रकाश टाकला. तसेच ते म्हणाले की, "2013 मध्ये निवडणुकीसाठी फक्त काही दिवस शिल्लक होते.

5 मार्च 2014 रोजी 123 प्रमुख मालमत्ता दिल्ली वक्फ बोर्डाकडे हस्तांतरित करण्यात आल्या. निवडणुकीला काही दिवस शिल्लक होते, तुम्ही वाट पाहायला हवी होती. तुम्हाला वाटलं होतं की तुम्हाला मते मिळतील, पण तुम्ही निवडणूक हरलात. तुम्ही म्हणालात की कोणताही भारतीय वक्फ बनवू शकतो.

आम्ही हा मुद्दा पुन्हा एकदा मांडला आहे की, ज्या व्यक्तीने किमान पाच वर्षे इस्लामचे पालन केले आहे तोच वक्फचा दावा करू शकतो हा मुद्दा आम्ही या आधी देखील मांडला होता. तसेच ते म्हणाले की, वक्फ बोर्डात 4 बिगर-मुस्लिम सदस्य असू शकतात आणि त्यापैकी 2 महिला असणे आवश्यक आहे". असा दावा देखील केंद्रीय संसदीय मंत्री किरेन रिजिजू यांनी यांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com