केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी घेतली राज ठाकरे यांची भेट

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी घेतली राज ठाकरे यांची भेट

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी घेतली सपत्नीक राज ठाकरे यांची भेट

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी घेतली सपत्नीक राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.  गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी ही भेट झालीय. राणे आणि राज ठाकरेंची ही सदिच्छा भेट असल्याची चर्चा आहे. 

काहीवेळा आधी नारायण राणे ‘शिवतीर्थ’वर दाखल झाले. तिथे राज ठाकरे आणि त्यांच्यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. या भेटीवेळी राज ठाकरे आणि नारायण राणे हे ‘शिवतीर्थ’च्या गॅलरीत पाहायला मिळाले.

मागच्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि भाजप नेत्यांमध्ये जवळीक वाढत आहे. भाजप नेते वारंवार राज ठाकरे यांची भेट घेत आहेत. आता नारायण राणे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com