Nitin Gadkari : नितीन गडकरींची राज्यसभेत मोठी घोषणा म्हणाले...

Nitin Gadkari : नितीन गडकरींची राज्यसभेत मोठी घोषणा म्हणाले...

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत एक मोठी घोषणा केली आहे की, शहरातील टोल माफ केला जाणार आहे. राज्यसभेत राज्यसभेतील सदस्यांनी एक्स्प्रेस-वेवर शहरांच्या हद्दीत टोल प्लाझा उभारण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत एक मोठी घोषणा केली आहे की, शहरातील टोल माफ केला जाणार आहे. राज्यसभेत राज्यसभेतील सदस्यांनी एक्स्प्रेस-वेवर शहरांच्या हद्दीत टोल प्लाझा उभारण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. यावर उत्तर देताना गडकरी यांनी सांगितले की, “सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने, पण एक्स्प्रेस-वेवरील टोलचा ‘फादर ऑफ टोल टॅक्स” मीच आहे.

मीच या देशात बीओटीचा सर्वात पहिला प्रकल्प आणला. महाराष्ट्रातील ठाणे भिवंडी बायपास हा पहिला प्रकल्प होता. आता आम्ही एक नवीन पद्धत सुरू करत आहोत, ज्यामध्ये टोलमधून शहरी भाग वगळला जाईल, त्यांच्याकडून टोल घेतला जाणार नाही. “हा माझा नव्हे, तर मागील सरकारचा दोष आहे. पण आम्ही यामध्ये दुरुस्ती करु. जे तुम्हाला वाटत आहे, त्याच माझ्याही भावना आहेत. आम्ही लवकरच सर्व गोष्टी दुरुस्त करु,” .

यासोबतच त्यांनी सांगितले की, १० किलोमीटर रस्त्याच्या वापरासाठी लोकांना ७५ किलोमीटरचा टोल भरावा लागतो असं नितीन गडकरींनी निदर्शनास आणून दिलं. हा मागील सरकारचा दोष आहे. शहरातील टोल माफ केला जाईल असं गडकरींनी सांगितले आहे.

Nitin Gadkari : नितीन गडकरींची राज्यसभेत मोठी घोषणा म्हणाले...
“तुमच्या धमक्यांना भीक घालणारी…”शिवसेनेचा हल्लाबोल
Lokshahi
www.lokshahi.com