केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पुन्हा एकदा वादात; छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख व्हिडिओ व्हायरल

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पुन्हा एकदा वादात; छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख व्हिडिओ व्हायरल

छत्रपती शिवाजी महाराजांवरच्या वक्तव्यावरून राज्यात चांगलेच वातावरण तापले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांवरच्या वक्तव्यावरून राज्यात चांगलेच वातावरण तापले आहे. यातच आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवराय यांचा एकेरी उल्लेख केल्याने पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे. शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत.

राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वक्तव्याप्रकरणात दानवे बोलताना दिसत आहेत. महाराजांवरील वक्तव्याची चौकशी व्हायला हवी. वक्तव्य वादग्रस्त होईल की नाही, हे तपासण्यात यावे, असे ते म्हणाले. असे बोलत असताना त्यांनी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे वातावरण तापले आहे.

राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वक्तव्याप्रकरणात व्हायरल व्हिडिओत दानवे बोलताना दिसत आहेत.महाराजांवरील वक्तव्याची चौकशी व्हायला हवी. वक्तव्य वादग्रस्त होईल की नाही, हे तपासण्यात यावे, असे ते म्हणाले. आपण शिवप्रेमी असल्याचा दावा ही त्यांनी केला.

पण याच व्हिडिओत बोलताना, त्यांनी महाराजांचा एकेरी उल्लेख केला

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com