केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या गाडीला अपघात

केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या गाडीला अपघात

केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या कारचा अपघात झाला आहे.

केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या कारचा अपघात झाला आहे. या अपघातात निरंजन ज्योती या जखमी झाल्या आहेत. वेगाने आलेल्या ट्रकने साध्वी निरंजन ज्योती यांच्या कारला जोरदार धडक दिली.

अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. कर्नाटकाच्या विजयपुरा येथे काल रात्री भीषण अपघात झाला. साध्वी निरंजन ज्योती इनोव्हा कारमधून जात होत्या.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. दोघांवरही स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.ही धडक इतकी जोरदार होती की, ट्रकच पलटी झाला. चालकाच्या सतर्कतेमुळे आमची कार ट्रक खाली आली नाही. आम्ही देवाच्या कृपेने मी सुरक्षित आहे. असे साध्वी निरंजन ज्योती यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com