कल्याण-नगर महामार्गावरील कांबा येथे खड्ड्यांच्या विरोधात गोविंदा पथकाचे अनोखे आंदोलन
Team Lokshahi

कल्याण-नगर महामार्गावरील कांबा येथे खड्ड्यांच्या विरोधात गोविंदा पथकाचे अनोखे आंदोलन

खड्डेमय रस्त्यात चार थर रचत व्यक्त केला प्रशासनाचा निषेध

आज देशभरात दहीहांडी साजरी केली जात आहे तर तिकडे दुसरीकडे रस्स्त्यावरील खड्ड्यांच्या विरोधात कल्याण-नगर महामार्गावरील कांबा गावात गोविंदा पथकाने अनोखे आंदोलन केले आहे. खड्डे बुजवण्यासाठी शिव नवतरुण गोविंदा पथकाने भर रस्त्याच्या खड्यात चार थराचा मानवी मनोरे रचत प्रशासनाचा निषेध केला.

कल्याण नगर मार्गावर कल्याण जवळ असलेल्या म्हारळ ते रायता गावादरम्यान रस्त्याची अक्षरशः चाळन झाली आहे. नगर पुण्याहून दूध, फळभाज्या यांच्यासह प्रवासी वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेला हा रस्ता वर्षांतून सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ खड्डेमय असतो. या रस्त्याचे काँक्रिटकरणाचे काम प्रस्तावित असले तरी अद्याप या कामाला मुहूर्त न मिळालेला नाही तर या रस्त्यावर पडलेले खड्डे अद्याप ही बुजवण्यात आलेले नाहीत त्यामुळे या रस्त्यावर वाहन चालवताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते.

अनेकदा तक्रारी, निवेदने आंदोलने करूनही अद्याप रस्त्याची डागडुजी न करण्यात आल्याने आज अखेर दही हंडी फोडण्यासाठी निघालेल्या या परिसरातील शिव नवतरुण गोविंदा पथकाने देखील या खड्ड्याचा निषेध करण्यासाठी खड्डेमय रस्त्यात चार थर रचले. रस्त्याची कामे लवकरात लवकर सुरू केली नाही तर गोविंदा पथकाने उग्र आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे.

कल्याण-नगर महामार्गावरील कांबा येथे खड्ड्यांच्या विरोधात गोविंदा पथकाचे अनोखे आंदोलन
दहीहंडी फोडल्यावर 55 लाखांसह स्पेनला जाण्याची ऑफर, मिळणार सरकारी नोकरीही
Lokshahi
www.lokshahi.com