गुजरातचा निरमा, क्लीनचीट मिळवा...; महाविकास आघाडीच्या आमदारांचे अनोखे आंदोलन

गुजरातचा निरमा, क्लीनचीट मिळवा...; महाविकास आघाडीच्या आमदारांचे अनोखे आंदोलन

गुजरातचा निरमा, क्लीनचीट मिळवा...; महाविकास आघाडीच्या आमदारांचे अनोखे आंदोलन

गुजरातचा निरमा, क्लीनचीट मिळवा... पन्नास खोके, एकदम ओके...गुजरात निरमा... ईडी, सीबीआय, आयटी मागे नाही लागणार... वॉशिंग मशीन खोके, आणि गुजरातचा निरमा, महाशक्तीला पाठिंबा द्या आणि क्लीनचीट मिळवा... गुजरात निरमा अभियान, चला पवित्र होऊन येऊ...अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत जोरदार निदर्शने केली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा सतरावा दिवस असून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.

गुजरातची निरमा आणि वॉशिंग मशीनचे बॅनर घेऊन महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com