Navi Mumbai Crime News
Navi Mumbai Crime News

नवी मुंबईत धक्कादायक घटना! किनारा हॉटेलच्या वेटरचा संशयास्पद मृत्यू, एक जण गंभीर

नवी मुंबई शहरात धक्कादायक घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे. जुहूगावच्या किनारा हॉटेलमधील वेटरचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
Published by :

नवी मुंबई शहरातील वाशी येथील जुहूगावच्या किनारा हॉटेलमधील वेटरचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अज्ञात इसमाने या वेटरवर चाकू हल्ला केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसंच या वेटरसोबत असलेला एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याचंही समजते आहे. हल्ला झालेल्या व्यक्तींबाबत सविस्तर माहिती समोर आली नाहीय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारात वेटर घरी जात असताना एका अज्ञात इसमाने त्याच्या हातातील मोबाईल आणि इतर सामान खेचण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या दोघांमध्ये झटापट झाली. त्यामुळे हा गंभीर प्रकार घडला. या घटनेबाबत झोन वनचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, "या सर्व घटनेचा तपास पोलीस करत असून आरोपींचा लवकरच शोध घेतला जाईल"

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com