मी बोलणारच, वाटल्यास निलंबित करा; संसदेत शब्दांवर बंदी घातल्यानंतर TMC खासदार संतापले

मी बोलणारच, वाटल्यास निलंबित करा; संसदेत शब्दांवर बंदी घातल्यानंतर TMC खासदार संतापले

तृणमूल काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही याविषयावरून केंद्रावर टीका करण्यात आली आहे.
Published by :
Sudhir Kakde

संसदेचं पावसाळी अधिवेशन 18 जुलैपासून सुरू होणार आहे. याआधीच काही विशिष्ट शब्दांची यादी जारी करण्यात आली असून, ते शब्द असंसदीय असल्यानं ते रेकॉर्डमध्ये ठेवू नयेत, असं सांगण्यात आलंय. यावरून आता विरोधकांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन म्हणाले, मी शब्द वापरणारच, त्यासाठी मला निलंबित व्हावं लागलं तरी चालेल. खासदार ओब्रायन यांनी ट्विटमध्ये लिहीलं, आम्हाला संसदेत बोलताना हे शब्द वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही, मात्र आपण या शब्दांचा वापर यापूढेही करणारच! सरकारला हवं असल्यास त्यांनी आपल्याला निलंबित करावं. मात्र आपण लोकशाहीसाठी लढणार आहोत. त्याचबरोबर तृणमूल काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही याविषयावरून केंद्रावर टीका करण्यात आली आहे.

लोकसभा सचिवालयाने बुधवारी एक पुस्तिका जारी केली, त्यानंतर हा वाद निर्माण झाला आहे. यामध्ये जुमलाजीवी, चाइल्ड इंटेलिजन्स, कोविड स्प्रेडर, स्नूपगेट, लाज, शिवीगाळ, मारहाण, भ्रष्ट, नाटक, हिपोक्रसी, अक्षम अशा काही शब्दांचा वापर 'असंसदीय भाषेच्या श्रेणीत' येईल. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेत हे शब्द वापरू नयेत असं स्पष्ट करण्यात आलं आहे. यासाठी लोकसभा सचिवालयाने 'असंसदीय शब्द 2021' या शीर्षकाखाली या शब्द आणि वाक्यांचं एक नवीन संकलन तयार केलंय. या शब्दांना 'असंसदीय अभिव्यक्ती' श्रेणीत ठेवण्यात आलं आहे. लोकसभा आणि राज्यसभेतील चर्चेदरम्यान खासदारांनी हे शब्द वापरले तर ते 'असंसदीय' मानले जातील आणि त्यांना सभागृहाच्या कामकाजाचा भाग बनवलं जाणार नाही. त्यामुळे विरोधक सरकारवर हल्लाबोल करत आहेत.

मी बोलणारच, वाटल्यास निलंबित करा; संसदेत शब्दांवर बंदी घातल्यानंतर TMC खासदार संतापले
Population control : "दोन अपत्यांच्या कायद्याला आम्ही समर्थन करणार नाही"

दरम्यान, लोकसभा सचिवालयाने ही पुस्तिका 2021 ची असून, कोणतीही नवीन पुस्तिका जारी केलेली नाही असं म्हटलंय. याप्रकरणी काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, सरकारवर टीका करणारे शब्द असंसदीय घोषित करण्यात आले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com