बातम्या
राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा; शेतकरी चिंतेत
राज्यातील शेतकरी अवकाळी पावसामुळे चिंतेत पडले आहेत.
राज्यातील शेतकरी अवकाळी पावसामुळे चिंतेत पडले आहेत. राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आता भर पडली आहे. अवकाळी पावसाचा फटका पिकांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील कापूस, केळी, मिरची आणि रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या पावसामुळं रब्बी पिकांचा धोका वाढला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळं आधीच पीक संकटात आल्यानंतर आता अवकाळी पाऊस सुरु झाला आहे.