Aadhar Card Update: 14 मार्चपर्यंत आधार कार्ड तपशील करा विनामूल्य अपडेट; अन्यथा...

Aadhar Card Update: 14 मार्चपर्यंत आधार कार्ड तपशील करा विनामूल्य अपडेट; अन्यथा...

आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची शेवटची तारीख 14 मार्च आहे. सध्या, केवळ myAadhaar पोर्टलवर कोणीही त्यांचे आधार कार्ड विनामूल्य अपडेट करू शकतो
Published by :
Dhanshree Shintre

मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची अंतिम मुदत संपणार आहे. डिसेंबर 2023 मध्ये युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आधारच्या मोफत अपडेटची अंतिम मुदत वाढवली होती. आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची शेवटची तारीख 14 मार्च आहे. सध्या, केवळ myAadhaar पोर्टलवर कोणीही त्यांचे आधार कार्ड विनामूल्य अपडेट करू शकतो. मात्र, ऑफलाइन अपडेट केल्यास 50 रुपये आकारले जातात.

UIDAI ने सांगितले की, रहिवाशांच्या सकारात्मक प्रतिसादाच्या आधारे, सुविधा आणखी 3 महिने म्हणजे 15/12/2023 ते 14/03/2024 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणीही आपले नाव, पत्ता, फोटो आणि इतर बदल UIDAI वेबसाइटवरून 14 मार्चपर्यंत मोफत अपडेट करू शकतो. तुम्ही कॉमन सर्व्हिसेस सेंटरला (CSC) भेट दिल्यास, तुमचे आधार कार्ड तपशील अपडेट करण्यासाठी 50 रुपये शुल्क आकारले जाईल.

आधार कार्ड वरील पत्ता ऑनलाइन कसा अपडेट करावा?

1. https://myaadhaar.uidai.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या व आधार क्रमांक वापरून लॉग इन करा.

2. त्यानंतर ‘प्रोसीड टू अपडेट ॲड्रेस’ या पर्यायावर क्लिक करा.

3. रजिस्टर मोबाईल नंबरवर पाठवलेला OTP एंटर करा.

4. त्यानंतर डॉक्युमेंट अपडेट या पर्यायावर क्लिक करा, त्यानंतर तुम्हाला तुमची माहिती दिसेल.

5. तपशील बरोबर आहे का ते तपासा आणि हायपरलिंक वर क्लिक करा.

6. त्यानंतर तुम्हाला ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा द्यावा लागेल, तो अपलोड करा.

7. 'सबमिट' पर्यायावर क्लिक करा

8. यानंतर 14-अंकी अपडेटेड रिक्वेस्ट नंबर (URN) जनरेट होईल, त्यानंतर अपडेट रिक्वेस्ट स्वीकारली जाईल.

काही दिवसांनंतर, तुम्ही या वेबसाइटवरून अपडेटेड आधार कार्ड डाउनलोड करू शकाल. मात्र 14 मार्चनंतर माहिती अपडेट करण्यासाठी 50 रुपये शुल्क द्यावे लागेल. तसेच आधार केंद्रांवर जाऊन जर तुम्ही काही माहिती अपडेट करायची असेल तर त्यासाठीही तुम्हाला पैसे मोजावे लागतील.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com