Urfi Javed : चेहऱ्यावर रक्ताचे डाग आणि डोळ्याखाली सूज; उर्फीला नक्की काय झालंय?
सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद नेहमी तिच्या हटके लुक आणि धाडसी फॅशनसाठी चर्चेत असते. पण यावेळी ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेचा विषय ठरली आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या काही फोटोंमध्ये तिच्या चेहऱ्यावर जखमेचे ठसे आणि रक्त दिसून येत आहे. डोळ्याखाली सूज असून सतत रक्त वाहत असल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.अनेकांना शंका आली की उर्फीवर कुणी हल्ला केला का? या फोटोंनंतर चाहते तिच्या प्रकृतीबाबत काळजी व्यक्त करू लागले. “नेमकं काय झालं?” हा प्रश्न सर्वत्र चर्चिला जाऊ लागला. जर ही जखम अधिक खोलवर झाली असती तर तिच्या डोळ्याला गंभीर इजा होण्याची शक्यता होती.
दरम्यान, उर्फीने स्वतः या घटनेचं सत्य स्पष्ट केलं. ती घरात सोफ्यावर बसली असताना तिची मांजर अचानक तिच्यावर उडी मारून तिच्या चेहऱ्यावर ओरबाडली. हा प्रसंग अगदी अनपेक्षित होता. उर्फीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मांजरीचे पालक असाल तर तुम्हाला हे नक्कीच समजेल.” उर्फी जावेदचे हे फोटो पाहून काहींनी दिलासा घेतला की हा फक्त अपघात आहे, तर काहींनी तिला अधिक काळजी घेण्याचा सल्ला दिला. तिच्या या पोस्टमुळे पुन्हा एकदा ती चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.