Uddhav  Thackeray
Uddhav Thackeray Team Lokshahi

उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक; आमदार, खासदार राहणार उपस्थित

निवडणूक आयोगामध्ये एकनाथ शिंदे यांना विजय झाला आहे.

निवडणूक आयोगामध्ये एकनाथ शिंदे यांना विजय झाला आहे. धनुष्यबाण निशाणी व शिवसेना हे नाव बाळासाहेबांच्या शिवसेनेला म्हणजेच शिंदे गटाला मिळाले आहे. निवडणूक आयोगाचा हा निकाल उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? यावर शिंदे-ठाकरे गटात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. 17 जानेवारी रोजी निवडणूक आयोगासमोर ठाकरे गटाकडून युक्तिवाद झाल्यानंतर शिंदे गटाने ठाकरे गटाचे दावे फेटाळून लावले होते. यावेळी 23 जानेवारीला दोन्ही गटांना लेखी स्वरुपात उत्तर देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिला होते. यानंतर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला धक्का देत धनुष्यबाण व शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिले आहे.

याच पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे यांनी आज (18 फेब्रुवारी) तातडीने पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्व आमदार, खासदार आणि नेते उपस्थित राहणार आहेत. आज दुपारी एक वाजता मातोश्रीवर ही बैठक होणार आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता पुढची भूमिका काय असणार यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीसाठी मतदारसंघात असलेले आमदार आणि खासदार तत्काळ मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com