Tahawwur Rana : तहव्वूर राणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा झटका; राणाच्या भारतात प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची याचिका फेटाळली

Tahawwur Rana : तहव्वूर राणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा झटका; राणाच्या भारतात प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची याचिका फेटाळली

तहव्वूर राणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

तहव्वूर राणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाच्या भारतात प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

भारतात प्रत्यार्पण न करण्याची तहव्वूर राणाने याचिका केली होती. भारत सरकारने त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. पण राणाने प्रत्यार्पणाला स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न केला होता.

याच पार्श्वभूमीवर आता भारताकडे प्रत्यार्पणाविरोधात त्याने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com