Donald Trump On India : "फक्त काही देशांसोबत व्यापार करार...", भारताबरोबर व्यापार करण्याबद्दल काय म्हणाले ट्रम्प ?

Donald Trump On India : "फक्त काही देशांसोबत व्यापार करार...", भारताबरोबर व्यापार करण्याबद्दल काय म्हणाले ट्रम्प ?

चीनसोबत करारानंतर ट्रम्प भारताकडे वळले, व्यापार चर्चेत वाढ
Published by :
Shamal Sawant
Published on

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि चीनमधील व्यापार कराराबद्दल मोठी घोषणा केली. यामुळे चीन आणि अमेरिका जवळ येत असल्याचे दिसून येत आहे. ट्रम्प यांनी भारताबद्दलही प्रतिक्रिया दिली. त्यांनी गुरुवारी सांगितले की, भारतासोबतही एक खूप मोठा व्यापार करार होणार आहे. ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या काही निर्णयांमुळे चर्चेत आहेत. इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर ते आता व्यापारावर लक्ष केंद्रित करत आहेत.

ट्रम्प यांनी अलीकडेच 'बिग ब्युटीफुल बिल' कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी ते म्हणाले, "प्रत्येकजण आमच्यासोबत व्यवसाय करू इच्छितो. काही महिन्यांपूर्वी मीडिया विचारत होता की व्यापार करारात खरोखरच कोणी रस दाखवेल का? आम्ही कालच चीनसोबत करार केला आहे. आम्ही आणखी चांगले करार करू. भारतासोबतही करार करता येईल. ट्रम्प यांनी हे देखील स्पष्ट केले की अमेरिका फक्त काही देशांसोबत व्यापार करार करेल. ते म्हणाले की, सर्वांसोबत करार होणार नाही.

भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच व्यापार करार होऊ शकतो. दोन्ही देश 9 जुलैपूर्वी कराराला अंतिम रूप देऊ शकतात. अमेरिकेने भारतातून येणाऱ्या वस्तूंवर 26 टक्के कर लावण्याची घोषणा केली होती. भारताला 26 टक्के कर मागे घ्यायचा आहे. ट्रम्पच्या कर निर्णयावर बराच गदारोळ झाला. त्यांनी चीनवरही कर लावला होता. चीननेही प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेवर कर लावला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com