जालन्यात थ्री इडीयट सिनेमाची पुनरावृत्ती, डाॅक्टरांनी केली व्हॅक्युअमने प्रसूती

जालन्यात थ्री इडीयट सिनेमाची पुनरावृत्ती, डाॅक्टरांनी केली व्हॅक्युअमने प्रसूती

महिला आणि बाल रुग्णालयात प्रसूतीचा थरार, अखेर डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया यशस्वी

रवी जैस्वाल|जालना: जालन्यातील महिला आणि बाल रुग्णालयात थ्री ईडीयट चित्रपटातील दृश्यासारखी व्हॅक्यूअम प्रसूती यशस्वी करण्यात आली आहे.तब्बल 17 डॉक्टरांनी केलेल्या या प्रसूतीला यश आलं आहे.या प्रसूती पूर्णपणे यशस्वी झाल्यानं महिलेसह बाळाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय.

जालन्यात थ्री इडीयट सिनेमाची पुनरावृत्ती, डाॅक्टरांनी केली व्हॅक्युअमने प्रसूती
'लव्ह जिहाद' प्रकरणावरून खासदार नवनीत राणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल

जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथील 21 वर्षाच्या गोदा गुडेकर शुक्रवारी सकाळी जालन्यातील महिला आणि बाल रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलं होतं.पण या महिलेला कायपोस्कोलिओ हा आजार आहे.हा आजार असल्यानं गोदा यांचा पाठीचा मणका हा वाकडा आहे.शिवाय गर्भाशयात बाळाला आवश्यक तेवढी जागा मिळाली नाही.त्यामुळे अशा रुग्णांची प्रसूती करणं डॉक्टरांसमोर मोठं आव्हान असतं.

शिवाय प्रसूतीसाठी आलेल्या महिलांच्या शरीरात प्लेटलेटही फक्त 78 हजार इतक्याच असल्यानं प्रसूती नॉर्मल आणि सीझर करणं देखील मोठं आव्हान होतं.याशिवाय भूल देताना देखील एक आव्हान बनलं होतं.त्यामुळे डॉक्टरांना या सर्व प्रक्रीयेसाठी 2 तास लागले.अखेर उपस्थित 17 तज्ञ डॉक्टरांच्या टीमने मेहनतीने व्हॅक्यूअम पद्धतीने प्रसूती केल्यानं महिलेच्या नाते वाईकांनी सुटकेचा निश्वास टाकला. प्रसूती झालेल्या महिलेसह बाळाची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय.

Lokshahi
www.lokshahi.com