Best Sandwiches in the World Vada Pav: जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत वडापाव तेराव्या स्थानी

Best Sandwiches in the World Vada Pav: जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत वडापाव तेराव्या स्थानी

मुंबईचा आवडता पदार्थ समजल्या जाणाऱ्या वडापावला आता जागतिक मान्यता मिळाली आहे.

मुंबईचा आवडता पदार्थ समजल्या जाणाऱ्या वडापावला आता जागतिक मान्यता मिळाली आहे. वडापाव हा मुंबईकरांच्या आयुष्यातील एक महत्वाचा घटक आहे. वडापाव आणि मुंबईकरांचे नाते याविषयी काही वेगळे सांगायला नको. वडापाव म्हटले की, पोटाची भूक भागवण्याचा एक भाग. मुंबईबाहेरील व्यक्ती मुंबईमध्ये आल्यावर हमखास वडापाव खातोच.

याच वडापावची दखल आता जागतिक स्तरावर घेण्यात आली आहे. मुंबईच्या प्रसिद्ध स्ट्रीट फूड वडापावला आता जागतिक मान्यता मिळाली आहे. जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत वडापाव 13 व्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये तुर्कीचा टॉम्बिक प्रथम क्रमांकावर आहे, त्यानंतर दक्षिण अमेरिकेतील पेरूचा बुटीफारा आणि तिसरा क्रमांक अर्जेंटिनाचा सँडविच डी लोमोला मिळाला आहे.

टेस्ट ॲटलस ही फूड ट्रॅव्हल गाईड वेबसाईट आहे.टेस्ट ॲटलस या जागतिक फूड ट्रॅव्हल गाईडच्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत वडापाव तेराव्या क्रमांकावर आहे. टेस्ट ॲटलसच्या जगातील 50 सर्वोत्कृष्ट सँडविचच्या यादीमध्ये मुंबईच्या वडापावने स्थान मिळवलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com