Vaibhavi Upadhyaya : ‘साराभाई वर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्री वैभवी उपाध्यायचं अपघाती निधन
Admin

Vaibhavi Upadhyaya : ‘साराभाई वर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्री वैभवी उपाध्यायचं अपघाती निधन

‘साराभाई वर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्री अभिनेत्री वैभवी उपाध्यायचं अपघाती निधन झाले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

‘साराभाई वर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्री अभिनेत्री वैभवी उपाध्यायचं अपघाती निधन झाले आहे. 32 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. हिमाचल प्रदेशमध्ये वैभवीच्या कारचा अपघात झाला. रस्त्याच्या एका तीव्र वळणावर गाडीचा ताबा सुटला आणि अपघात झाला.

वैभवीने मालिकांसोबतच चित्रपटांमध्ये देखिल आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. दीपिका पदुकोणच्या ‘छपाक’ या चित्रपटात तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. वैभवी तिच्या पतीसोबत उत्तर भारतात फिरायला गेली होती. तिथेच तिचा कार अपघातात मृत्यू झाला.

आज (बुधवार) सकाळी 11 वाजताच्या सुमारास मुंबईत अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com