Chiplun
ChiplunTeam Lokshahi

माजी पालकमंत्री वायकर चिपळुण नगरपरिषदेत बसवणार छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारुढ पुतळा

स्वखर्चाने आमदार रविंद्र वायकर अश्‍वारुढ पुतळा बसवणार, २०१९-२० साली जिल्हास्तरीय नगरोत्थानमधून रविंद्र वायकर यांनी ८६ लाख ४७ हजार २८९ इतका निधी मंजुर केला. सप्टेंबर २०१९ मध्ये सदर कामाचे करण्यात आले भुमिपूजन.
Published by :
Sagar Pradhan

चिपळुण तालुक्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारुढ पुतळा उभारण्याचे चिपळुणकरांचे स्वप्न लवकरच पुर्ण होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री यांची संकल्पना व मंजुर केलेला निधी यामुळे लवकरच चिपळुण नगरपरिषदेत हा पुतळा बसविण्यात येणार आहे. याचे काम अंतिम टप्प्यात असून पुढच्या वर्षी १ मे महाराष्ट्र दिना अगोदर पुतळा बसवून त्याचे भव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून अनावरण करण्यात येणार आहे. या कामाची माहिती चिपळुण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शिंगटे यांनी आमदार वायकर यांना दिली.

रत्नागिरी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी राजपुर येथे छत्रपती शिवाजी महाराज तसेच कसबा, तालुका संगमेश्‍वर येथे संभाजी महाराज यांचा भव्य असा पुतळा बसविल्यानंतर चिपळुण नगरपरिषदेतही छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्‍वारुढ पुतळा बसविण्यात यावा, अशी मागणी चिपळुणकरांकडून सातत्याने करण्यात येत होती. त्यानुसार चिपळुण नगरपरिषदेच्या १०.९.२०१८ च्या मुख्यसभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारुढ पुतळा बसविण्याचा ठराव मंजुर करण्यात आला होता. तत्कालिन जिल्ह्याचे पालकमंत्री वायकर यांनी २०१९-२० मध्ये जिल्हास्तर नगरोत्थानमधून अश्‍वारुढ पुतळा उभारणे व परिसराच्या सुशोभिकरणासाठी मिळून ८६ लाख ४७ हजार २८९ इतका निधी मंजुर केला होता. सप्टेंबर २०१९ मध्ये या कामाचे भुमिपूजन करण्यात आले होते. चिपळुण नगरपरिषदेत बसविण्यात येणार्‍या अश्‍वारुढ पुतळा स्वखर्चाने बसविण्यात येईल, अशी घोषणा वायकर यांनी केली होती.

त्यानुसार पुतळा तयार करण्यात आला आहे. वायकर यांच्या सुचनेनुसार मुख्याधिकारी शिंगटे यांनी सोमवारी पुतळ्याची पाहणीही केली. सध्या पुतळा उभारणे कामाच्या ठिकाणी चबुतर्‍याचे बांधकाम करण्यासाठीच अंदाजपत्रकीय रक्कम ३६ लाख ८०हजार ७०० चे काम नगरपरिषदेच्या फंडातून हाती घेण्यात आले आहे. मार्च २०२३ पर्यंत चबुतर्‍याचे व परिसर सुशोभिकरणाचे काम पुर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी माहिती चिपळुण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शिंगटे यांनी आमदार वायकर यांना दिली. या कामाच्या प्रतगीची माहिती देण्यासाठी शिंगटे यांनी सोमवारी मुंबईत रत्नागिरी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व आमदार वायकर यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी सुरू असलेल्या कामाचे सादरीकरण संकल्पचित्राद्वारे वायकर यांना केले. लवकरात लवकर हे काम पुर्ण करुन पुतळ्याचे अनावरण करण्यात यावे, अशी सुचना वायकर यांनी यावेळी मुख्याधिकारी यांना केली. यावेळी मुख्याधिकारी शिगंटे यांच्या समवेत चिपळुण नगरपरिषदेचे अधिकारी उपस्थित होते. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com